अशी बनवा ‘महमुदाबादी कच्ची चिकन बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

बिर्याणीचे विविध प्रकार आपल्याला शहरानुसार बदललेले दिसतील. विशेषकरून जिथे मुघल वास्तव्यास होते तिथले बिर्याणीचे प्रकार लाजवाब आहेत. लखनौ जवळील महमुदाबाद येथील नवाबी स्पेशल अशी ही राजघराण्यातील बिर्याणी. ह्या बिर्याणीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या बिर्याणीत कांदा, आलं व लसूण ह्याचा वापर जराही केलेला नाही तरीसुध्दा एकदम चविष्ट व सुवासिक अशी ही महमुदाबादी कच्ची बिर्याणी.

साहित्य घ्या मंडळी हो…

 1. ७५० ग्राम चिकन
 2. ४०० ग्राम बासमती तांदूळ
 3. २०० ग्राम दही
 4. २०० ग्राम क्रीम
 5. 2 टेबल स्पून लाल मिरची पावडर
 6. 1 टी स्पून हळद
 7. 2 टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर
 8. २०-२५ बदाम
 9. 10 काळी मीरे
 10. 10 लवंगा
 11. 10 वेलदोडे
 12. 2 तेजपत्ता
 13. तुकडा दालचीनी चा
 14. तुकडा जायफळ चा
 15. 2 जावीत्री
 16. चवीनुसार मीठ
 17. 1 टेबलस्पून चिकन मसाला
 18. 7-8 चमचे तूप
 19. २०-२५ केशर दुधात भिजवून

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. सर्व प्रथम ५ वेलची व जावित्री पाण्यात १५ मिनिटे भिजवून घ्या. २० बदाम एका कढईत टाकून रोस्ट करून घ्या व त्या बदामांची पावडर करून घ्यावी. मिक्सरच्या भांड्यात ५ बदाम,लवंग, वेलदोडे, काळी मीरीची पावडर करून घ्या. आता भिजवून घेतलेले वेलदोडे, जावित्री व दोन चमचे क्रिम टाकून त्याची पेस्ट करून घ्या.
 2. चिकन धुवून घ्या व त्यात २ चमचे लाल मिरची पावडर, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, मिक्सरमध्ये केलेल्या मसाला व निम्मे दही घालून चांगले एकत्र करा. त्यात २ चमचे तूप घालून मिक्स करा. आता त्यावर बदामाची पावडर घालून एकत्र करा.
 3. बासमती तांदूळ २०-२५ मिनिटे भिजवून वितळत ठेवा. दुसऱ्या भांड्यात भातासाठी पाणी गरम करून उकळी आल्यावर त्यात दोन चमचे तूप,२-२ लवंग, मीरे व तेजपत्ता टाकून त्यावर तांदूळ टाका व ७०% भात शिजवून घ्या व बाकीचे पाणी काढून घ्या.
 4. आता भांड्यात दोन चमचे तूप घालून त्यावर वेलदोडे, जावित्री व क्रिम घालून केलेली पेस्ट तूपावर टाकून परतून घ्या. आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून त्यात दही घाला व त्यात लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर व गरम मसाला घालून परतून साल्सा तयार होईल. व्यवस्थित परतून घेतले की बाजूने तेल सुटेपर्यंत परतावे व त्यात मेरीट केलेले चिकन पसरवून घ्या. चिकन टाकले कि तेल सुटलेले त्यावर येतेव चिकन कच्चे असून तयार झालेल्या सारखे वाटते.
 5. आता तयार केलेला भात चिकनवर घाला. दुधात भिजवून घेतलेले केशर भातावर घाला व झाकण ठेवून २०-२५ मिनिटे वाफेवर बिर्याणी शिजवून घ्या.
 6. गरम गरम बिर्याणी कोथिंबीर घालून खाण्यासाठी तय्यार…

संपादन : संचिता कदम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here