धक्कादायक : म्हणून २ कोटींना ‘बिग’ झटका; पहा, कोणत्या ‘बास्केट’मध्ये झालाय घोळ

सायबर सिक्युरिटी आणि त्या संबंधित अनेक प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी केंद्र सरकारच्या आधार डेटावरही काहीजण नजर रोखून बसल्याच्या बातम्या वेळोवेळी येत असतात. आताही एका खासगी कंपनीच्या डाटामधून किमान २ कोटी युझर्सची माहिती पळविण्याचा यशस्वी ‘पराक्रम’ भामट्यांनी केला आहे.

अशी कोणती बलाढ्य कंपनी आहे असाच प्रश्न आपणास पडला असेल ना? होय, टी कंपनी आहे बिगबास्केट. होय, तीच कंपनी जी अनेक मोठ्या शहरात घरपोहोच किराणा, भाजीपाला आणि फळ उपलब्ध करून देते. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी बेंगलोर सायबर पोलिसांना तक्रार दिलेली आहे.

Cyble नावाच्या पोर्टलवर याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. त्यात म्हटले आहे की, ग्रॉसरी ई-कॉमर्स प्लेटफॉर्म बिगबास्केट यांच्या माहितीची चोरी करण्याचे हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलेले आहे. ही माहिती चक्क ऑनलाईन पद्धतीने विक्रीला ठेवण्यात आलेली आहे. १५ जीबी डाटा असलेली ही फाईल आहे.

महत्वाचे म्हणजे हा डाटा फ़क़्त ईमेल आईडी, फोन नंबर, आॅर्डर डिटेल्स आणि पत्ता यांचाच आहे. यामध्ये कंपनीने कोणाचेही क्रेडीट किंवा डेबिट कार्ड डीटेल्स सेव्ह न ठेवल्याने त्यांची चोरी अजिबात झालेली नाही. याबाबत कंपनीने ही माहिती दिली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here