मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे कडाडले…

नांदेड :

मराठा आरक्षणाच्या संबंधित राज्यातील विद्वानांची समिती गठीत करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्याआधी आम्हाला त्या संदर्भातील माहिती सांगा, शिवाय या 420 एमपीएससी पास विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्त्या का नाहीत?, असा सवाल उपस्थित करत संभाजीराजेंनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडात आज मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा, असं सांगत संभाजीराजेंनी काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर खोचक टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. मी नेतृत्वासाठी बाहेर पडलो नाही, घटक म्हणून समाजासाठी काम करतो आहे. मराठा समाजाचा सेवक म्हणून काम करायचं आहे, असं मराठा समाज ओबीसीविरोधात नाही.

दरम्यान ‘मराठा समाजाला न्याय द्या, ही आमची हात जोडून विनंती आहे. येत्या काळात जर न्याय मिळाला नाही तर केवळ सरकारविरोधातच नाही तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही मराठा समाज सोडणार नाही. त्यांच्याही घरी आम्ही मोर्चा काढू. बंगल्यावर आंदोलन करु. त्यांच्या काळातही मराठा आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आता पेटून उठू’, असा इशारा मराठा आंदोलकांनी ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here