‘या’ पक्षप्रमुखाचा सवाल; आचार्य उद्धव ठाकरे मंदिरं कधी सुरु करणार?

अकोला :

मंदिरे सुरु करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाद सुरु आहेत. भाजप मंदिरे उघडण्याच्या भुमिकेवरून प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. अशातच ‘’आचार्य उद्धव ठाकरे, आचार्य अजित पवार आणि आचार्य बाळासाहेब थोरात मंदिरं कधी सुरु करणार आहात? आचार्य आणि हभप यांचं वाकडं आहे का?’, असा सवाल वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.   

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, भाविकांसाठी मंदिरं सुरु करा, आम्ही चाचणी करतो. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मंदिरांची असेल. सरकार सांगेल तिथे कोविड सेंटर उभे करण्याची तयारी मंदिरांनी दाखवली होती.

राज्यात आता जवळपास सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण मंदिरं अद्याप सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यावरुन भाजपची आध्यात्मिक आघाडीही जोरदार आंदोलन करत आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनीही मंदिराच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारले आहेत. आता यावर महाविकास आघाडी सरकार काय उत्तर देणार, याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here