फक्त भारतीय म्हणून नाही तर ‘त्या’ विशेष कारणामुळे रोहीत पवारांनी केले कमला हॅरिस यांचे कौतुक

मुंबई :

आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीचे निकाल लागले. यात डेमोक्रेटिक पक्षाचे ७७ वर्षीय जो बिडेन हे अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. तसेच उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली. अमेरिकेत लागलेल्या निवडणूक निकालाचे पडसाद भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात उमटल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर ‘अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी आपल्या विजयाचं श्रेय आपल्या आईला दिलं. भारताची माती कायम कृतज्ञतापूर्वक ममत्व जपणारी आहे, हेच यातून स्पष्ट होतंय’, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कमला हॅरिस यांचे कौतुक केले आहे.

यावेळी या राजकीय विजयाबद्दल अभिनंदन करत पुढे बोलताना पवार म्हणाले की, कमला हॅरिस यांनी रचलेल्या दैदिप्यमान इतिहासाचा भारतीय म्हणून अभिमान वाटतो. दरम्यान रोहित पवारांनी यावेळी भाजपलाही टोला हाणला. पवार म्हणाले की, बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा.       

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here