संतप्त भाजप नेत्याचा सवाल; डोनाल्ड ट्रम्प भाजपतून उभा होता की काय?

मुंबई :

अमेरिकेत लागलेल्या निवडणुकीच्या निकालांनी सर्वांचे लक्ष वेधले. ७७ वर्षीय जो बिडेन हे अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. अमेरिकेत लागलेल्या निवडणूक निकालाचे पडसाद भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात उमटल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेत झालेल्या सत्ता बदलाची तुलना बिहार निवडणुकीशी करीत राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बिहारमध्येही असाच बदल अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मूर्खपणाचा कळस आहे, डोनाल्ड ट्रम्प भाजपातून उभा होता की काय?’, असा सवाल भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी विचारला आहे.    

सत्ताधारी आमदारांना, मंत्र्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये काही कामचं राहिला नाही असं वाटतं. फालतूगिरी बंद करा, सत्तेत आहात तर लोकांची कामं करा, असे म्हणत राणे यांनी मविआच्या नेत्यांना सल्लाही दिला आहे.

नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार :-

बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here