कांद्याचे भाव स्थिर; कांद्याच्या विक्रीबाबत शेतकऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

लासलगाव :

केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना साठवणुकीचे निर्बंध घालून दिले. नंतर व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागा मार्फत छापे मारले त्याही पुढे जाऊन कांद्याची आयातही करण्यात आली. आणि गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढत असताना दसऱ्याच्या दरम्यान भाव घसरले. गेल्या ८ दिवसात कांद्याच्या दरात घसरण होत आहे.   

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील कांदा मार्केट विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम दरावर होत असल्याचे दिसून आले आहे. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. लासलगाव येथील मुख्य बाजार आवारावर ३४०० रुपयांवर कांदा दर स्थिर झाले जरी असेल तरी गेल्या सात दिवसांमध्ये कांदा दरामध्ये २२०० रुपयाची प्रति क्विंटल मागे मोठी घसरण झाली आहे.

दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी नाफेडच्या माध्यमातून कांदा आयात करून खरेदी करण्याऐवजी राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमधूनच कांदा खरेदी करावा अशी मागणी केली आहे. नाफेडच्या माध्यमातून १५ हजार टन कांदा आयात करून ५ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होणार आहे. यामुळे राज्यातील कांद्याचे भाव पडून कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याऐवजी नाफेडने राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमधूनच कांदा ५ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करावा आणि कांदा उत्पादकांचे नुकसान थांबवावे.

असे होते गेल्या ७ दिवसातील सरासरी भाव :-
२ नोव्हेंबर – ५३०० प्रति क्विंटल
३ नोव्हेंबर – ४००० प्रति क्विंटल
४ नोव्हेंबर – ३४०० प्रति क्विंटल
४ नोव्हेंबर – ३६५१ प्रति क्विंटल
६ नोव्हेंबर – ३२०० प्रति क्विंटल
६ नोव्हेंबर – ३४०१ प्रति क्विंटल

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here