मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; ‘त्यावरून’ मुख्यमंत्र्यांचा टोला

मुंबई :

मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गला हलवले आहे. सध्या ज्या जमिनीवर काम चालू आहे ती जमीन केंद्रा सरकारच्या मालकीची असल्याचा दावा केला जात आहे. तर राज्य सरकारने मात्र ती जमिन राज्याच्याच मालकीची असल्याचे सांगितले आहे. यावरून भाजप नेत्यांनी मविआ सरकारवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर ‘कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे म्हणणाऱ्यांनी मिठागरात मिठाचा खडा टाकू नका’, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपला नाव न घेता टोला लगावला.

मुंबईकरांच्या हितासाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणार. काहीजण ती जमीन मिठागराची आहे, असं म्हणत आहेत, पण ती जर मिठागराची जमीन आहे, असे म्हणणाऱ्यांना एक कळत तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकत आहात. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व जे टीका करतात त्यांना समर्पक उत्तर देऊ, असे पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मिठाचा खड्याचा इलाज काय करायचा तो करु, असा इशाराही त्यांनी पुढे बोलताना दिला. ते म्हणाले की, मेट्रोसाठी जर्मनीच्या के. एफ. डब्ल्यू या कंपनीकडून 545 दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक दरात घेतलं आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आम्ही सुद्धा डोळे बंद करुन काही काम करत नाही. जे काही मुंबईकरांच्या हिताचे असेल ते टीकेची पर्वा न करता ते करणार म्हणजे करणारचं. कोणत्याही परिस्थिती करु.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here