‘हे म्हणजे “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” सारखंच झालं’; अमेरिकेच्या निकालावरून ‘त्यांनी’ उडवली फडणवीसांची खिल्ली

मुंबई :

अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजयी झाले तर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मी ही निवडणूक जिंकली बरेच काही करून’ असे ट्विट केले. यावरून युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे.

हे म्हणजे “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” सारखंच झालं… असे म्हणत तांबेंनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. विशेष करून भारत आणि महाराष्ट्रात यावरून अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना या निमित्ताने भाजपवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. याचा पुरेपूर फायदा कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी घेत भाजपवर सडकून टीका केली आहे.

तांबे यांच्या या ट्वीटवर विविध समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. ट्रम्प यांचे हे ट्विट सत्यजीत तांबे यांनी, ‘हे म्हणजे “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” सारखंच झालं… अशी कमेंट करीत रिट्विट केले आहे.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here