पेटीएम, गुगल पे, फोन पे, जिओ पे, अॅमेझॉन पे वापरणाऱ्यांनो ‘या’ आर्थिक बदलासाठी व्हा तयार

मुंबई :

सध्या अनेक आर्थिक नियम बदलत आहेत. विविध बँका, मोबाईल वॉलेटही आता आपले निकष बदलाच्या मार्गावर आहेत. आता तुम्हीही पेटीएम, गुगल पे, फोन पे, जिओ पे, अॅमेझॉन पे आणि इतर काही मोबाईल वॉलेट वापरत असाल तर तुम्हालाही काही आर्थिक बदलांसाठी तयार राहावे लागणार आहे. कारण नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्स वर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे.   

या सर्व थर्डपार्टी अॅपसाठी हा नियम १ जानेवारी २०२१ पासून लागू होण्याची शक्यता आहे. बँकाही आता आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी आपले नियम बदलत आहेत. दरम्यान आता व्हाटसअॅपवरही पेमेंट ट्रान्सफर करण्याची सोय आली आहे. परंतु आता नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयाने UPI ट्रान्झॅक्शनमध्ये एकाच पेमेंट अॅपची एकाधिकारशाही संपणार आहे. तसेच थर्ड पार्टीला मिळणारे विशेष फायदे या निर्णयामुळे थांबणार आहेत.

२ अब्ज यूपीआय ट्रान्झॅक्शन प्रत्येक महिन्याला होत आहेत. प्रत्येक पेमेंट गेटवे आणि बँका या सुविधेचा वापर करीत आहे. सामान्य लोकांना यात मोठा फायदा होत आहे. UPI ट्रॉन्झॅक्शनमध्ये अधिक वेग येण्याची शक्यता आहे. यासाठी NPCI थर्ड पार्टी अॅप ट्रान्झॅक्शनवर लगाम लावण्याचा विचार करीत आहे. १ जानेवारीनंतर अॅप आपल्या टोटल वॉल्यूमच्या जास्तच जास्त ३० टक्केच ट्रान्झॅक्शन करू शकतील, अशी माहिती NPCI ने दिली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here