अभिजित बिचुकले इज बॅक; राज्यातील ‘या’ निवडणुकीतही देणार टक्कर

मुंबई :

राष्ट्रपतीपदापासून तर लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढवत भल्याभल्यांना समोर रिंगणात उतरणाऱ्या अभिजित बिचकुले यांनी बिग बॉसही गाजवले. नंतर काही काळ ते चर्चेत नव्हते, मात्र आता पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. अभिजित बिचुकले यांनी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रत्येक निवडणुकीत लढवणारे आणि एकही निवडणूक न जिंकणारे बिचकुलेंनी यापूर्वी उदयनराजे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही निवडणुका लढविलेल्या आहेत.

याविषयी बोलताना बिचकुले म्हणाले की, चाहतावर्ग मला कायमच पाठिंबा देत असतो. परंतु पैसा आणि सत्तेच्या ताकदीसमोर माझी चिकाटी कमी पडते. त्यामुळेच आपला पराभव होत आला आहे. परंतु पदवीधरच्या निवडणुकीत मतदारांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मी शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य देणार आहे. मला एकदा संधी देऊन पाहावी.

या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी तयारी केलेली आहे. विविध पक्षांकडून अनेक लोक इच्छुक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची तयारी सुरू केली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रूपाली पाटील-ठोंबरे यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्या मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here