तेव्हा धोनीने रागात बॅट फेकून दिली आणि…. वाचा कॅप्टन कुलचा भन्नाट किस्सा

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे अनेक किस्से नेहमीच आपल्यासमोर येत असतात. सर्वसाधारणपणे कॅप्टन कूल अशी प्रतिमा बाळगणारा धोनी चिडतो आणि रागावतो हे फारच कमी लोकांना माहिती असेल. नुकतीच काही दिवसांपूर्वी धोनीने निवृत्ती घेतली. त्यानंतर धोनी रागावतो आणि रागवल्यावर काय करतो याचे किस्से आपण ऐकलेच आहेत. आजही एक किस्सा सांगितला आहे भारताचा माजी स्विंग गोलंदाज इरफान पठाण याने…

हा किस्सा सरावादरम्यान घडला असला तरी इतर वेळेसही धोनी रागावतो कारण तो ही एक माणूस आहे. हा किस्सा सांगताना इरफान म्हणाला “एकदा सराव करत असताना आम्हाला एक महत्त्वाचा बदल करायला लावला.  जो उजव्या हाताने फलंदाजी करतो त्याने डाव्या हाताने फलंदाजी करावी, असे आम्हाला सांगण्यात आले होते.

हा किस्सा २००६-०७ या सालचा आहे.

प्रत्येकाने हात बदलून फलंदाजी करण्याचा नियम होता आणि त्यावेळी नेमके धोनी फलंदाजी करत होता. एक क्षण असा आला कि फलंदाजी करताना धोनी आऊट झाला, पण त्याला वाटले की, आपण नॉट आऊट आहोत. त्यामुळे धोनी रागावला आणि इतका रागवला की त्याने आपली बॅट चक्क  मैदानात फेकून दिली आणि तो ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला. त्यानंतर सरावासाठीही तो उशिरा मैदानात आला होता. त्यामुळे धोनीला राग येतो, ही गोष्ट खरी आहे.”

कॅप्टन कूल असणारा धोनी इतका चिडतो हे त्याच्या चाहत्यांनाही माहिती नाही. मात्र जेव्हा खरोखर ग्राउंड मॅच खेळायची वेळ तेव्हा मात्र तो थंड डोक्याने खेळतो आणि मनाच्या विरुद्ध चालू असलेला डाव पलटतो म्हणूनच तर धोनीला कॅप्टन कूल म्हणतात.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here