रॉयल एन्फिल्ड आणणार 28 नवे मॉडेल; पहा नेमेक काय नियोजन आहे कंपनीचे

भारतातील सर्वाधिक दमदार आणि आकर्षक बाईक म्हणून रॉयल एन्फिल्ड मोटारसायकल सर्वांना परिचित आहे. याच कंपनीने आपल्या ग्राहकांना नवनवीन बाईकवर राईड करण्याची संधी देण्यासाठी खास योजना आखली आहे. त्यानुसार प्रत्येक तिमाहीत एक नवे दमदार मॉडेल आणण्याची तयारी कंपनीने केली आहे.

भारतीय बाजारासह जगभरातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने विस्तार धोरण ठेवले आहे. त्यानुसार थायलंड आणि ब्राझीलमध्ये कंपनीचे असेम्ब्ली युनिट उभे केले जाणार आहेत. तसेच पुढील सात वर्षांसाठी बाजारात आणण्याच्या नव्या मॉडेलवरही त्यांनी वर्कआउट केले आहे. त्यानुसार कंपनी तब्बल 28 नवे मॉडेल्स आणणार आहे.

250cc ते 750 cc या क्षमतेच्या दमदार आणि आकर्षक बाईक बाजारात आणण्याची ही योजना आहे. त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने दणक्यात तयारी केली आहे. जगातील बाजारात आपल्या कंपनीचे ग्राहक आणि मार्केट टक्का वाढवण्यासाठी कंपनीने हे पाउल उचलले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here