SBI ने शेतकऱ्यांसाठी आणली ‘ही’ खास सोय; पहा काय मिळणार ग्राहकांना सुविधा

भारतातील पब्लिक सेक्टरमधील सर्वात मोठी आणि जगभरातील एक बलाढ्य कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी काळानुरूप बदल केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना थेट कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यात या बँकेने आघाडी घेतली आहे.

आपण या बँकेचे ग्राहक असाल आणि त्यांचे योनो (YONO) नावाचे बँकिंग अॅप्लिकेशन वापरत असाल तर ही सेवा आपण तातडीने वापरायला मोकळे आहात. होय, कारण त्यांचे मार्केट मंडी सेक्शनमध्ये आपण थेट कृषी निविष्ठा खरेदी करू शकता. त्यासाठी आपणाला त्या सेक्शनमध्ये जावे लागणार आहे. यात शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशक, यंत्रसामग्री, सेंद्रिय आणि इतर अनेक प्रकारच्या कृषी निविष्ठा खरेदी करता येतील.

IFFCO ई बाजार यांच्यातर्फे विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तू योनो यावर उपलब्ध आहेत. यावरून खरेदि करताना कमीतकमी कितीची खरेदी करावी याचाही काहीच नियम नाही. सुमारे ३ कोटी ग्राहकांना या सेवेचा लाभ होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

मुख्य म्हणजे यावर शेतकऱ्यांना आपल्या स्थानिक भाषेतून ही माहिती मिळणार आहे. देशभरातील प्रमुख 10 भाषा यामध्ये जोडलेल्या आहेत. त्याद्वारे माहिती वाचून ग्राहकांना खरेदी करणे शक्य होणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here