दिवाळीमध्ये सतावतेय पैशांची कमी; Paytmने आणली जबरदस्त सुविधा, वाचा कसा घ्याल लाभ

मुंबई :

कोरोनामुळे अनेक लोक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. दिवाळी तोंडावर आली असताना खर्च करण्यासाठी अनेकांना पैशांची चिंता सतावते आहे. आता टेंशन घेण्याची गरज नाही कारण आता Paytmने एक जबरदस्त सुविधा आणली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील अनेक कंपन्या बाय नाउ पे लेटर अशी सुविधा देत असताना पेटीएमकडूनही अशीच एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे.  या सर्व्हिसचं नाव पेटीएम पोस्टपेड असं असून या सर्व्हिसमध्ये तुम्ही खरेदीसाठी आता पेटीएमकडून पैसे घेऊ शकता.

विशेष म्हणजे यात तुम्हाला १ लाखांपर्यंत क्रेडीट मिळत आहे. आणि तुम्ही आता बिनधास्त मोठी खरेदी करू शकता. तब्बल महिनाभराने पैसे देण्याची सवलत पेटीएमकडून देण्यात आली आहे.

पेटीएम पोस्टपेड सर्व्हिसविषयी मुद्देसूद माहिती :-

– सर्व्हिसचा वापर युजर, रिचार्ज, बिल पेमेंट किंवा खरेदी इत्यादीसाठी करू शकतो. 

– किराणा स्टोरवरूनही Buy Now Pay Later अशाप्रकारे खरेदी करू शकतात.      

– Lite, Delite आणि Elite असे तीन वेरिएंट आहेत. पोस्टपेड लाईटमध्ये 20000 रुपयांपर्यंतची मर्यादा आहे.

– पोस्टपेड डिलाईट आणि पोस्टपेड एलीटमध्ये 20000 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे.

– यात कोणत्याही प्रकारची कन्विनियंस फी नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here