मोबाईल अपग्रेड करण्यासाठी 70 % डिस्काऊंट; पहा कोणत्या कंपनीने आणलीय ही खास स्कीम

आपला जुना मोबाईल फोन अपग्रेड करून नव्या फिचर आणि जास्त स्पेस व RAM चा फोन वापरण्याची क्रेज कायम आहे. अशावेळी आपला बाजारातील हिस्सा अजिबात कमी होऊन न देण्यासाठी शाओमी या चीनी कंपनीने खास ऑफर आणली आहे.

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दसऱ्यापासून कंपनीने 15 टक्क्यांपेक्षा जास्त मोबाईल विक्री केली आहे. कंपनीची स्पर्धा, samsung, विवो, ओप्पो, रिअलमी या आघाडीच्या कंपन्यांसोबत आहे. त्यांना मागे सारून बाजारातील आपला हिस्सा टिकवणे आणि वाढवणे यासाठी कंपनीने 70 % डिस्काऊंट देण्याची ऑफर आणली आहे.

होय, आपल्याकडे कंपनीचा MI किंवा रेड्मी या दोन्हीपैकी एका ब्रांडचा मोबाईल असल्यास त्याला ‘मी स्मार्ट अपग्रेड’ योजनेच्या मदतीने ही ऑफर लागू असणार आहे. आपला जुना फोन देऊन त्यातून मिळणारी सूट वजा करता उरलेले पैसे देऊन ग्राहकांना नवीन स्मार्ट फो खरेदी करता येणार आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here