अशी बनवा झणझणीत ‘अंडा चिंगारी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

अंड्याचे आपण फार थोडके पदार्थ करतो. अंडा भुर्जी, ऑम्लेट, अंड्याची भाजी, अंडा बिर्याणी यापलीकडे घरी आपण फारसे पदार्थ बनवत नाहीत. अंड्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. चवदार आणि झणझणीत असणारी ही अंडा चिंगारी आपल्याला नक्कीच आवडेल.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 5 अंडे
 2. 1 कांदा
 3. 1 टॉमेटो
 4. 6 ते 7 लसूण पाकळ्या
 5. 1 इंच आले
 6. 1 टेबलस्पून काळी मिरिपुड़
 7. 2 टेबलस्पून गरम मसाला
 8. 1 टेबलस्पून तिखट
 9. 1/4 टीस्पून हळद
 10. 1 टेबलस्पून मीठ
 11. 3 टेबलस्पून तेल
 12. 3 टेबलस्पून कोथिंबिर

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. 2 अंडी फोडून त्यात काळी मिरीपुड़, मिठ घालुन एका कढईत तेल गरम करून त्याला मोकळे शिजून घ्यावे व बाजूला ठेवावे.
 2. कांदा, टॉमेटो, आले, लसूणची पेस्ट करुन घ्यावी. एका कढईत तेल गरम करून परतून घ्यावे व गरम मसाला, तिखट, हळद, मिठ घालून मिश्रण एकजीव करावे
 3. आता थोडे थोडे पाणी घालून ऊकळी आणावी व त्यात तयार केलेले अंडे घालावे व थोडे शिजवणे
 4. 3 अंडी उकडून सोलून 4 भाग कापून घ्यावे व ते तयार ग्रेव्हीत टाकावे.
 5. सगळे छान शिजवावे आणि वरुन कोथिंबीर घालून अंडा चिंगारी गरम गरम खायला तय्यार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here