असे बनवा चविष्ट ‘ब्रेड गुलाबजाम’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सहजपणे गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण अगदी हलवाईसारखे म्हणजे मिठाईच्या दुकानासारखे मऊ मुलायम गुलाबजाम घरीसुद्धा बनवता येतात. आपल्या घरी खवा नसताना सुद्धा अगदी खव्याच्या टेस्ट सारखे ब्रेड वापरुन गुलाबजाम बनवता येतात. ब्रेडचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत.

साहित्य घ्या मंडळीहो…

पाक बनवण्यासाठी :-

 1. 2 वाट्या साखर
 2. 2 मोठे ग्लास पाणी
 3. 1 टी स्पून वेलची पावडर

गुलाबजाम बनवण्यासाठी :-

 • 2 मोठे पेकेट ब्रेड स्लाईस
 • 1 कप दूध
 • 8-10 काजू तुकडे
 • केशर
 • तूप किंवा तेल गुलाबजाम तळण्यासाठी
 • बदाम व पिस्ते सजवटी करीता

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. पाक बनवण्यासाठी एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी मिस्क करून माध्यम विस्तवावर पाक बनवायला ठेवा. साधारणपणे पाक बनवायला 5-7 मिनिट लागतील. पाक फार पातळ किंवा फार घट्ट बनवायचा नाही अगदी थोडासा चिकट झाला पाहीजे. मग त्यामध्ये केशर, वेलची पावडर घालून मिक्स करून विस्तव बंद करून भांडे झाकून ठेवा.
 2. गुलाबजाम बनवण्यासाठी ब्रेडच्या चारी बाजूंनी कडा कापून बाजूला ठेवा. ब्रेडच्या कडा टाकून देवू नका. त्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे आपल्याला कटलेट किंवा कबाब बनवतांना वापरता येतील.
 3. ब्रेडच्या कडा कापल्यावर एका बाउलमध्ये ब्रेडचे तुकडे करून घेवून त्याचा चुरा करून घ्या. मग त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून आपण जसे पीठ मळतो तसे मळावे. पीठ फार घट्ट किंवा सैल मळू नका. आपण नेहमी मळतो तसे मळा. मग झाकून 5 मिनिट बाजूला ठेवा.
 4. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे एक सारखे गोळे बनवा. एक गोळा बनवला की त्यामध्ये एक काजू खोचून परत गोळा चांगला बंद करा. अश्या प्रकारे सर्व गोळे बनवून घ्या. गोळे वळताना हाताला थोडेसे तेल लावून मळले तरी चालेले.
 5. कढईमध्ये तूप अथवा तेल गरम करून घेवून गोळे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या.
 6. साखरेचा पाक बनवलेल्या भांड्यात तळलेले गुलाबजाम घालून झाकण ठेवून मंद विस्तवावर 5 मिनिट गरम करून घ्या
 7. थंड झाल्यावर बाउलमध्ये काढून घेवून त्यावर बदाम व पिस्ते चीरून घाला व मग सर्व्ह करा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here