‘त्या’ मुद्द्यावरून उद्योग मंत्रालयाने दिला इशारा; वाचा, काय आहे विषय

दिल्ली :

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या नावाखाली इतर त्रयस्थ घटकाकडून पात्र लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे असे दिसून आले आहे. त्यावर सामान्य नागरिक आणि पात्र लाभार्थी यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केंद्र सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने केले आहे.

उद्योग मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पीएमईजीपी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांशी खाजगी एजन्सी किंवा इतर संस्था संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन त्यांची फसवणूक करताना आढळून आल्या आहेत. अशी फसवणूक करणाऱ्या घटकांचा सरकार लवकरच तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचा इशारा उद्योग मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. दरम्यान यासाठी  पोलीस तपास यंत्रणांना तपासाचे आदेश दिले असल्याचेही समजत आहे.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा केंद्र सरकारचा 100% अनुदान असलेला कार्यक्रम देशात सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी 2008 – 09 पासून राबवला जात आहे. हा कार्यक्रम एमएसएमइ मंत्रालयाकडून राबविला जातो. योजनेअंतर्गत अर्जदारांना बँकाकडून कर्ज मंजुरी आणि निधी हस्तांतरण प्रक्रिया खादी व ग्रामोद्योग आयोग द्वारा संचालित या https://www.kviconline.gov.in/pmeepeportal/pmegphome/index.jsp यावे पोर्टल द्वारे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाते. ही संपूर्ण योजना राबविण्यासाठी सरकारकडून कोणत्याही त्रयस्थ, मध्यस्त, किंवा संस्था, एजन्सी यांची नेमणूक केलेली नाही.

संपादन : अशोक बडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here