अबबब केळीची सालही आहे एवढी फायद्याची; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

आपण नेहमी केळी खाल्ल्यावर तिची साल फेकून देतो. आपण दैनंदिन आयुष्यात सर्वच फळांबाबत तसेच करतो. डाळिंबाचे दाने खातो, साल फेकतो, संत्री, मोसंबी, चिकू अशा कितीतरी फळांबाबत आपण हीच पद्धत वापरतो. पण आपल्याला माहिती नसेल की या फळांच्या साली प्रचंड औषधी आणि गुणकारी आहेत. केळीच्या सालीचे फायदे तुम्ही जर जाणून घ्याल तर, केळी खाण्याऐवजी तुम्ही सालीच खाल. आज आपण बाराही महीने मिळणाऱ्या केळीच्या सालीचे सेवन केल्यास काय फायदे मिळतात हे जाणून घेणार आहोत.

१) केळीच्या सालीत असणाऱ्या फायबरमुळे वजन कमी होते. तुम्ही जर रोज एका केळीची साल खाल तर, एक महिन्यात तुमचे वजन २ ते ३ किलोंनी कमी होऊ शकते.

२) केळीच्या सालीत असणाऱ्या सॉल्यूबल आणि इन्सॉल्यूबल फायबरमुळे शरीरातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी होते.

३) केळीच्या सालीत असणाऱ्या ल्यूटीन या घटकामुळे दृष्टीदोष दूर होतात. ते डोळयाची नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते. 

४) केळीच्या सालीमध्ये सेरोटोनिन असते जे तुमचे मन प्रसन्न (मूड) करण्यासाठी फायदेशीर ठरते.

५) केळीच्या सालीत असणारे ट्रिप्टोफेन नावाचा घटक तुमची झोप चांगली आणि आरोग्यदाई करण्यासाठी मदत करतो.

संपादन : माधुरी चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here