मुंबई पोलिसांनीही केली अमेरिका निवडणुकीची चेष्टा; दिला ‘हा’ महत्वाचा संदेश

मुंबई :

सध्या अमेरिकेत चालू असलेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकीचा निकाल काय येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे, आर्थिक जगताचे लक्ष लागलेलं आहे. आता तर सामान्य जनतेलाही बिडेन २६४ आणि ट्रम्प २१४ हा आकडा पाठ झाला आहे. अमेरिकेत चालू असलेल्या मतमोजणीला विलंब लागत असल्याने त्यावर आता जोकही सुरु झाले आहेत. अशातच चक्क मुंबई पोलिसांनीसुद्धा अमेरिका निवडणूक मतमोजणीची चेष्टा केली आहे.

बिडेन – 264, ट्रम्प – 214 आणि मुंबई पोलीस – 100 हे नंबर कधीच बदलणार नाहीत, असे म्हणत अमेरिका मतमोजणीवर चेष्टा करत मुंबई पोलिसांनी ट्वीट केले आहे. आपल्या सुरक्षेसाठी १०० नंबर दाबा, असे आवाहनही त्यांनी पुढे केले आहे.

मुंबई पोलिस हे नेहमीच सोशल ट्रेंड्समध्ये सहभागी होऊन काहीतरी सामाजिक संदेश देत असतात. मुंबई पोलिसांचे ट्वीटर खाते खूप उत्तम पद्धतीने चालवले जाते, असे कौतुकही नेटकरी आणि सेलिब्रिटी कायम करत असतात. याही वेळी खूप क्रिएटिव्ह पद्धतीने मुंबई पोलिसांनी या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला. दरम्यान या ट्वीटचेही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.      

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here