मुंबई :
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचं हे पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, अकरावी, इंजिनियरिंग, मेडिकल अशा सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडलेल्या आहेत. मराठा तरूणांच भवितव्य अंधकारमय होत चाललं आहे. मात्र बिनकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, हे सिद्ध होत आहे.
पुढे बोलताना त्यांनी लोकलच्या मुद्द्यावरूनही सरकारला सुनावले. ‘गेले सात महिने लोकल सेवा ठप्प असल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. राज्य सरकार त्यावर अजूनही काहीच नियोजन करताना दिसत नाही. हे सरकार अजुन किती दिवस ढिम्म बसून राहणार आहे?’, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित केला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव