…तर अख्खं मंत्रालय पेटवून देऊ; ‘त्यांनी’ दिला गंभीर इशारा

मुंबई :

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला दिसत आहे. मराठा ठोक मोर्चाच्या वतीने शनिवारी ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. नामदेव पायरीचं दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सकल मराठा समाजाच्या पायी दिंडीला सुरूवात झाली आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

‘सरकार जर त्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी मंत्रालयाचा एक मजला जाळू शकते तर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास मराठा समाज अख्खं मंत्रालय पेटवू शकतो’, असे आक्रमक झालेल्या देशमुख यांनी म्हटले आहे.      

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, अगोदरच्या सरकारचा धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण, असा होता तर आताच्या सरकारचा धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलांचं मरण, असं आहे. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लगेपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती न करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान पंढरपुरातून पायी निघालेल्या मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. पोलीस मराठा कार्यकर्त्यांना धरपकड करण्याच्या तयारीत असल्यानं वातावरण तापलं आहे. पोलीस आणि मराठा समन्वयकामध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here