मुख्यमंत्र्यांनी वेळ नाही म्हणून शिवसेना नेत्याने घेतली थेट राज्यपालांची भेट; राज्य सरकारची केली ‘ती’ तक्रार

मुंबई :

आता विविध राजकीय पक्षाचे नेते तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न जाता राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे जातात. विशेषकरून सत्ताधारी पक्ष सोडता इतर सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत म्हणून एका शिवसेना नेत्याने थेट राज्यपालांची भेट घेतली आहे. शुक्रवारी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दर्जा असणारे किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

गेल्या ४ दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न तिवारी यांनी केला. मात्र अखेरीस कंटाळलेल्या तिवारींनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईत आलो होतो, पण मुख्यमंत्री भेटले नाहीत, त्यामुळे राज्यपालांकडे जाऊन भेट घेतली असल्याचे यावेळी तिवारी यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा, खुद्द राज्यपालांनी या भागाचा दौरा करावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी निवेदनद्वारे केली. ‘राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत घोषित केली आहे, ती पुरेशी नाही’ अशी तक्रारही तिवारींनी करत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here