‘या’ राज्यातही होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कडक कायदा; वाचा काय आहे प्रकरण

दिल्ली :

गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने लव्ह जिहाद हा विषय वर तोंड काढतो आहे. समाजातही या प्रकरणावरून दुही निर्माण होत असल्याचे चित्र आहे. देशातील अनेक राज्यांनी या लव्ह जिहाद विरोधी कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याची तयारी होताना दिसत आहे.

कर्नाटक सरकार लव्ह जिहाद संपुष्टात आणण्यासाठी कडक पावले उचलणार आहे. आम्ही वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्म परिवर्तनाच्या बातम्या पाहिल्या आहेत. मी अगोदरच यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. इतर राज्य याबद्दल निर्णय घेतील की नाही याची मला पर्वा नाही, मात्र कर्नाटकात मला हे संपवायचे आहे, असे म्हणत या लव्ह जिहाद विरोधी आक्रमक भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी घेतली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मला लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यायचा आहे. येत्या दोन -तीन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेणार आहोत. दरम्यान कर्नाटकच्या सरकारने यापूर्वीच लव्ह जिहाद विरोधी आपली भूमिका स्पष्ट केली होती. कर्नाटकचे गृहमंत्री बोमानी यांनी लव्ह जिहाद विरोधात कायद्याचे स्पष्ट संकेत देत आपला विरोध असल्याचे सांगितले होते. बोमानी म्हणाले होते की, बरेच दिवसांपासून लव्ह जिहाद सुरू आहे. हा एक सामाजिक राक्षस आहे. तसेच, आम्ही याबाबत विचार करत आहोत की, या विरोधात आपण काय पावलं उचलू शकतो. यासंदर्भात आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here