श्रीरामपूर शहर हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती करा; ‘या’ पक्षाची मागणी

अहमदनगर :

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे व माजी नगरसेविका सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी पदाधिकारी व नागरिकांसमवेत श्रीरामपूरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर डेरे यांना दिले. त्यावेळी श्रीरामपूर शहर हद्दीतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन श्री.डेरे यांनी शिष्टमंडळाला दिले
श्रीरामपूर शहर हद्दीतील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करवी, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्री.मुरकुटे व सौ.मंजुश्री मुरकुटे यांच्यासह नाना पाटील, अ‍ॅड्.सुभाष चौधरी, अ‍ॅड्.उमेश लटमाळे, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, सौ.शालिनी कोलते, सौ.सुशिला करपे, संकेत संचेती, साजिद मिर्झा, कंत्रोड महाराज, अंबादास पवार, प्रमोद करंडे, गणेश दहिवाळ, विजय पाटील, प्रदीप जाधव, राजकुमार झांजरी, लाला देवी, सदाशिव मुळे, प्रकाश पांडे, प्रविण फरगडे, मनोज दिवे, अक्षय माने, दत्तात्रय मेटे, जयेश परमार, महेश तांबडे, नानासाहेब निकम, बापू जाधव, संतोष सोनवणे, बाळासाहेब शिंदे आदींसह नागरीक यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहर हद्दीतील नेवासा रोड, संगमनेर रोड, बेलापूर रोड, गोंधवणी रोड तसेच मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड यांच्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जागोजागी खड्डे झाले असल्यामुळे वाहने चालविणे आणि पायी चालणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. त्याचबरोबर या खड्ड्यांमुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून वाहन चालक व नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
श्रीरामपूर शहरातून जाणारे मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची अवस्था पाहता खड्डे युक्त शहर बनले आहे. यासंदर्भात श्रीरामपूर नगरपरिषदेने दुर्लक्ष केले असून दिवाळी पुर्वी शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात येवून खड्डे मुक्त श्रीरामपूर शहर करावे. तसेच शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नसून त्याचेही काम हाती घेणे गरजेचे आहे. सदर रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण झाले नाही तर लोकसेवा विकास आघाडी व श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या वतीने घेरा घालण्यात येईल, असे म्हटले आहे. यावेळी मुख्याधिकारी श्री.डेरे यांनी शहर हद्दीतील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची डागडूजी तातडीने हाती घेण्यात येईल, असे शिष्टमंडळाला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here