भारताला झटका; चिन्यांनी घेतला ‘तो’ निर्णय, पहा चोरांच्या उलट्या बोंबा काय त्या

अवघ्या जगभरात करोना विषाणूचा वानवळा पाठवणाऱ्या चीनने भारतीयांच्या बाबतीत एक निर्णय घेऊन आपण साव असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे.

होय, चिन्यांनी भारतीयांना त्यांच्या देशात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना विषाणूमुळे भारतात कोविद १९ आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यांच्या देशात पुन्हा या आजाराची साथ येऊ न देण्यासाठी असा निर्णय घेतल्याचे त्यांनी कळवले आहे.

भारतासह ब्रिटन, फ्रांस, बेल्जियम आणि फिलिपाईन्स या देशातील नागरिकांनाही चीनने प्रवेश बंदी जाहीर केली आहे. चीनने ही बंदी तात्पुरती असल्याचे म्हटले आहे. मात्र, अवघ्या जगात हा विषाणू पसरवण्याचे पातक केलेल्या चिन्यांना आता उपरती सुचली आहे.

या म्हणजे एका अर्थाने चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. त्यामुळे अनेकांनी याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. व्यावसायिक किंवा इतर निमित्ताने चीनला जाणाऱ्यांना त्यामुळे आता आणखी काही कालावधीसाठी थांबावे लागणार आहे. अनेक कंपन्या चीनमधून आपली गुंतवणूक मागे घेत आहेत. त्याच्या प्रक्रियेवरही यामुळे विपरीत परिणाम होणार आहे.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here