त्यावेळी होणार बटाट्याचे भाव कमी; पहा दिवाळीत किती भाव खाणार बटाटा..!

सध्या कांद्यासह बटाटा या पिकाचे भावही जोमात आहेत. देशांतर्गत बाजारात मागणीच्या तुलनेत बटाट्याचा पुरवठा कमी असल्याने आयत करण्याचे प्रयत्न करूनही सध्या हा बटाटा 34 रुपये किलोने होलसेल मार्केटमध्ये भाव खात आहे.

सध्याचा ट्रेंड लक्षात घेता आणखी किमान 40-45 दिवस बटाटा भाव खाणार आहे. त्याचवेळी दिवाळीच्या काळात तर बटाट्याचे भाव होलसेल मार्केटमध्ये थेट 40 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यूपी कोल्ड स्टोरेज एसोसिएशनचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला ही माहिती दिली आहे.

मागील हंगामात पंजाब आणि इतर कामही भागात बटाट्याच्या बियाण्याचे भाव 30 वरून थेट 50 रुपये किलोवर गेले होते. त्याचवेळी उत्तरप्रदेश राज्यात सरकारने 32 रुपये किलोने बियाने शेतकऱ्यांना देण्याची सोय केली होती. यंदाही तसेच नियोजन करण्यात आलेले आहे. पुढील एक महिन्यानंतर उत्तरप्रदेश राज्यातील नवीन बटाटा बाजारात येण्यास सुरुवात होईल. मगच याचे भाव कमी होण्यास सुरुवात होईल.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here