उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना दिले ‘दिवाळी गिफ्ट’; पहा कोणता शेतकरी हिताचा निर्णय घेतलाय ते

देशातील प्रमुख राज्य असलेल्या उत्तरप्रदेशने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर असा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सरकारने हा महत्वाकांक्षी निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या उत्तरप्रदेश राज्यात बाजार समितीमधील व्यवहारावर 2.5 टक्के इतके शुल्क आकारले जाते. त्यामध्ये 0.5 टक्के विकास शुल्क असते. ते तसेच ठेवताना एकूण 2 टक्के बाजार शुल्क 50 टक्के करण्याचा निर्णय तेथील सरकारने जाहीर केला आहे.

त्यामुळे आता बाजार शुल्क फ़क़्त 1 टक्के द्यावे लागेल. परिणामी शेतकऱ्यांना आपल्या व्यवहारावर 2.5 टक्के नाही, तर फ़क़्त 1.5 टक्के इतकाच कर द्यावा लागणार आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. अनेकांनी हे शुल्क आणखी कमी करण्याची आपली मागणीही लावून धरली आहे.

उत्तरप्रदेश सरकारने करोनाच्या काळातही शेतकऱ्यांच्या 45 शेतमाल उत्पादनांना करमुक्त केले होते. त्याद्वारे फळ आणि भाजीपाला यांच्यासाठी शेतकऱ्यांना फ़क़्त 1 टक्का इतकेच बाजार शुल्क द्यावे लागत आहे. त्यात आता इतर शेतमालालाही फ़क़्त 1.5 टक्के शुल्क द्यावे लागणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here