टेक्नोलॉजी क्षेत्रातील सर्वात महत्वाची बातमी: Google चे ‘हे’ प्रसिद्ध अ‍ॅप होणार बंद

दिल्ली :

मागील आठवड्यात क्रोम या गुगलच्या अ‍ॅपमध्ये मोठा बग सापडला होता. त्यामुळे मोबाईलमधील महत्वाची माहिती चोरी होण्याची शक्यता होती तसेच  प्रायव्हसीला धोका असल्याचा इशाराही गुगलने दिला होता. दरम्यान आठवडा उलटतो न उलटतो तोच गुगलने क्रोम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. . पुढील वर्षी फेब्रुवारी 2021 मध्ये गुगल क्रोमची सेवा बंद होणार आहे. गुगल कीप अ‍ॅपसाठी गुगल क्रोम बंद केले जाणार आहे.

कंपनी गुगल कीपचे ऑफलाईन अक्सेस देखील बंद करणार आहे. याआधी एकदा क्लिक करून युजर्स कीप अ‍ॅपचा वापर करू शकत होते. परंतु आता युजर्स क्रोमवर गुगल कीप वेब वर्जनला बुकमार्क करू शकतात. यासाठी त्यांना अ‍ॅड्रेस बारच्या उजव्या बाजूला स्टारवर क्लिक करावं लागणार आहे त्यानंतर गुगल बुकमार्क करावं लागेल.

का केले आहे क्रोम बंद :-

गुगलने 2008 मध्ये आपल्या युजर्ससाठी सर्च ब्राउझर म्हणून गुगल क्रोम बाजारात आणलं होतं. गुगल क्रोम सध्या विंडोज, लिनक्स आणि आयओएस या सिस्टीमवरदेखील चालत आहेत. त्यानंतर मागील 12 वर्षांत यामध्ये विविध बदल करण्यात आले होते. परंतु युजर्सचा कमी झालेला प्रतिसाद पाहून गुगलने क्रोम अपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here