BLOG : योग्यतासिद्ध असा हा मित्र..!

‘खरा वकील तोच असतो जो सत्य आणि सेवेला सर्वात प्रथम प्राधान्य देतो व नंतर वकिलीकडे व्यवसाय म्हणुन पाहतो’, असे आपण कुठेही वाचलेय का? नाही ना.. नसेल वाचले तर असा विचार मांडणारा आणि त्यानुसार जगणारा मानून म्हणजे अॅड. योगेश गेरंगे पाटील. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्यावरील हा शब्दाप्रपंच.

योगेश या शब्दाचा अर्थ आहे योग्यता असलेला. होय, ज्यामध्ये योग्यता आहे असाच हा सामाजिक जाणीवा असलेला माणूस आहे. योगेश गेरंगे म्हणजे एक दिलखुलास आणि अफलातून व्यक्तिमत्व. आमच्या ‘टीम कृषीरंग’सह शेतकरी व कष्टकरी बांधवांसाठी कार्यमग्न असलेल्या अनेकांच्या जीवनातील कायद्यामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्याचे आणि नवी उभारी देण्याचे काम योगेश गेरंगे निस्वार्थ भावनेने करतात.

कोणाच्याही मदतीला धावून जाण्याचा त्यांचा गुण. त्यामुळेच अनेकजण त्यांच्यावर प्रेम करतात. नगरमधोल वकिलांच्या संघटनेत काम करताना त्यांनी आपल्या नेतृत्वगुणाची झलक दाखवून दिली आहे. पदाचा कोणताही आब न मिरवता लोकांच्या भावनांशी एकरूप होऊन काम करणे त्यांना आवडते. तोच त्यांचा स्थायीभाव आहे.

गुगल सर्व केल्यावर आपल्याला योगेश शब्दाचे अर्थ पाहायला मिळतात. पहिला आहे योग्यता आणि दुसरा म्हणजे पौराणिक संदर्भाने आदियोगी अर्थात भगवान शिवशंकर. हा माणूसही दिसायला तसाच भोळा सांब आहे. राज्यकर्ता साप्ताहिकाचे संपादक महादेव गवळी आणि ग्रामावार्ताचे संस्थापक दिवंगत संतोष शिंदे यांच्यामुळे हा माणूस संपर्कात आला आणि मित्रच बनून गेला. मदतीला तत्पर आणि सामन्यांच्या सेवेमध्ये समाधान मानणारा हा एक खास मित्र आहे.

त्यामुळेच वाढदिवसाच्या निमित्ताने टीम कृषीरंगतर्फे त्यांना शुभेच्छा..

शब्दांकन : सचिन मोहन चोभे

*(आपणही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर 9404977723 हा आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here