मुलांना शाळेत पाठवण्याचा विचार करताय; थांबा, आधी AIIMS चा ‘कोरोना’ रिपोर्ट नक्कीच वाचा

दिल्ली :

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मधल्या काळात प्रशासनाकडून शाळा सुरु करण्यासाठीची सूचक वक्तव्य करण्यात आले होते. अशातच राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता तुम्हीही आपल्या मुलांना शाळेत पाठवायचा विचार करत असाल तर थांबा, आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील कोरोना संदर्भातील रिपोर्ट वाचा कारण हा रिपोर्ट समोर आल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली आहे.

एम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधील महत्वाची माहिती मुद्देसूद :-

  • पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 40% रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. यातील 73.5% रुग्ण 12 वर्षाखालील आहे.
  • मुलांना कोरोना होतो पण त्याच्यात लक्षणे दिसून येत नाही त्यामुळे या वयाची मुले पॉझिटिव्ह आहेत कि नाही कुणाला समजून देखील येत नाही.
  • देशभरात १० राज्यांमध्ये शाळा सुरु झाल्या असून उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यांचा समावेश आहे. एम्सच्या अहवालानुसार, कोरोना संक्रमित 4 पैकी 3 मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत जी इतर मुलांसाठी अतिशय धोकादायक असतात. त्यामुळे अनेक मुलांना संक्रमण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे.
  • आंध्र प्रदेशात नववी आणि दहावीचे वर्ग २ नोव्हेंबरपासून खुले करण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांतच 575 विद्यार्थी, 829 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here