‘ती’ कंपनी पुन्हा आली जोमात; सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात वाढ

मुंबई :

रिलायन्सचा नफा आणि रिलायन्समधील गुंतवणूक सातत्याने वाढत असली तरी रिलायन्सला आठवड्याच्या पहिल्याच दिवसाच्या सकाळी मोठा झटका बसला होता. सोमवारी सकाळी बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर्स धडाधड कोसळले. तब्बल ६ टक्क्यांनी शेअर पडल्याने एका झटक्यात Reliance ला झाले 68093 कोटींचे नुकसान झाले होते. नंतर सलग दुसऱ्या दिवशी रिलायन्सचा शेअरमध्ये घसरण झाली होती. आज मात्र बाजारात गुंतवणूकदार मोठी उत्साहात होते. आंतरराष्ट्रीय बाजाराकडूनही सकारात्मक संदेश आले होते. त्यामुळे आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारातील निर्देशांकात वाढ झाली.  आजच्या तेजीचे नेतृत्व रिलायन्स कंपनीने केले.   

मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्‍सला 42 हजाराचे वेध लागले आहेत. शुक्रवारी सेन्सेक्‍स 1.34 टक्‍क्‍यांनी म्हणजे 552 अंकांनी वाढून 41,893 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 143 अंकांनी वाढून 12,263 अंकावर बंद झाला. दरम्यान . सौदी अरेबियाची गुंतवणूक कंपनी PIF (Public Investment Fund) ने रिलायन्स रिटेलमधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली.  9,555 कोटी रुपयांची गुंतवणूक PIF (Public Investment Fund) ने रिलायन्स रिटेलमध्ये केली. या डीलचा रिलायन्सच्या शेअर्सवर योग्य परिणाम आढळून आले. रिलायन्सचा शेअर आज तीन टक्‍क्‍यांनी वाढला.

अद्यापही राजकीय वर्तुळाचे आणि आर्थिक जगताचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आलेले नाही. निकालानंतर परिस्थिती अशीच पोषक राहिली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 12,430 ते 12,700 अंकापर्यंत मजल मारू शकतो. दरम्यान बजाज फिन्सर्व, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी, कोटक बॅंकेचे शेअर आघाडीवर होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here