तुम्हालाही आहे कमी झोपण्याची सवय; सामोरे जावे लागेल ‘या’ गंभीर आजारांना

कमी झोपण्याचे अनेक तोटे आहेत. हे तोटे दिसायला वेळ लागत नाही. अनेक छोटछोट्या गोष्टींतून कमी झोपण्याचे गंभीर परिणाम शरीराला जाणवत असतात. आजकालचे युग हे स्पर्धेचे आहे. सर्वानाच पुढे जायचे आहे पण पुढे जात असताना शरीराची साथ महत्वाची आहे. सुधृढ आरोग्य हवे असेल तर पुरेशी झोप गरजेची आहे. निरोगी आरोग्यासाठी चांगलं खाणं-पिणं, व्यायाम, डाएट, ध्यान धारणा करणं गरजेचं आहे. तितकंच पुरेशा प्रमाणात झोपणं देखील महत्त्वाचं आहे. तुम्हीही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हालाही काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल.    

अपुऱ्या झोपेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम वाचल्यावर बसेल धक्का :-

१) गरजेनुसार झोप न घेतल्यानं मेंदूमध्ये एक प्रोटीन तयार होतं, ज्यामुळे स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होतो.

२) अपुर्या झोपेमुळे एकाग्रता, समस्या सोडवण्याची क्षमता कमी होऊ लागते.

  • ३) अपुऱ्या झोपेमुळे लैंगिक क्षमतेवरही दुष्परिणाम होतो. शरीरात ताण आणि आळस असल्यामुळे सेक्ससाठीचा उत्साह निघून जातो.

४) पुरेशी झोप न आल्याने साखरयुक्त आणि जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा वाढते. हे अन्न आपल्याला शरीरासाठी हानिकारक आहे.

५) अपऱ्या झोपेमुळे ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कॅन्सर) होण्याचा धोका अधिक असतो.

  • ६) कमी झोपेमुळे दृष्टीवर देखील परिणाम होतो.

७) आवश्यकतेनुसार झोपतच नसाल तर शरीरात विषारी पदार्थ बाहेर फेकले जात नाहीत. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. परिमाणी हृदयविकाराचा झटका येण्याचा शक्यता असते.

८) अपुऱ्या झोपेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.

९) अपुऱ्या झोपेमुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. ज्यामुळे अनेक मानसिक आजार होण्याची भीती असते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here