रात्रीची चांगली झोप हवीय; ‘हे’ आहेत उपाय

अनेक लोक रात्रीची झोप जास्त वेळ घेतात. तरीही त्यांना सकाळी उठल्यावर पुरेशी आणि शांत झोप झाल्यासारखे वाटत नाही. आज कालच्या स्पर्धेच्या युगात पुरेशी आणि शांत झोप व्हायलाच हवी, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. उत्तम झोप तर उत्तम आरोग्य मिळते. चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे. जर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या कामावर आणि दिनचर्येवर होत असतो. म्हणूनच चांगली आणि शांत झोप येण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्या.

  • कॅल्शिअमचा स्रोत असलेले दुधात ट्रिप्टोफन आणि सेरोटोनिन ही तत्वचांगली झोप यायला मदत करतात म्हणून झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध प्या.
  • झोपण्याआधी बदाम किंवा केळं खाणेही फायदेशीर ठरू शकते. 
  • तिळ, बदाम किंवा खोबरेल तेलाचा वापर करून झोपण्याच्या १०-१५ मिनिटं आधी हाताला आणि पायाच्या तळव्यांना हळुवार मसाज करा.
  • झोपण्याच्या २० मिनीटे आधी टेलिव्हीजन, कॉम्प्युटर किंवा कोणत्याही स्क्रीनकडे पाहू नका. झोपताना डोळे ताणविरहीत ठेवा.
  • झोपताना एकूणच डोळ्यांवर प्रकाश येऊ देऊ नका. 
  • जेवल्यानंतर लगेच झोपू नका. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here