अशी बनवा टेस्ट मे बेस्ट ‘दिलबहार बर्फी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारी ही दिलबहार बर्फी टेस्ट मे बेस्ट आहे. आता ही बर्फी तुम्ही घरीही तयार करू शकता. जेव्हा तुम्ही ही बर्फी खाल त्यानंतर तुम्हाला स्वीट होममधून बर्फी खरेदी करायची इच्छा होणार नाही. नक्कीच ट्राय करा. आपल्याला ही बर्फी आवडेलच…

साहित्य घ्या मंडळीहो…

  1. 3 वाटी डेसिकेटेड कोकोनट
  2. 1 1/2 वाटी कंडेन्स मिल्क
  3. ड्रायफ्रूट फ्रुटस
  4. रोझ इसेन्स
  5. खायचा लाल रंग

हे साहित्य घेतलं असेल वाट कसली बघताय लागा की बनवायला…

  1. एका पातेल्यात डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क, रोझ एसेन्स टाकून छान मिक्स करा.
  2. छान मिक्स झाल्यावर दोन भाग करा. एका भागात लाल रंग टाका. एक भाग खाली डब्याला लावा. लाल भाग त्याच्या वर लावा.
  3. थोडा वेळ फ्रीझ मध्ये ठेवून नंतर त्याच्या वड्या बनवा.
  4. वरून ड्रायफ्रूट टाकून सजवा. दिलबहार बर्फी खाण्यासाठी तय्यार आहे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here