नोकरीची सुवर्णसंधी : बँकिंग क्षेत्रात निघालीय बंपर भरती; असा करा अर्ज

मुंबई :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल ने स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इ्च्छिणारे उमेदवार IBPS चे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ibps.in वर जाऊन आपला अर्ज दाखल करू शकतात. अर्ज करण्यासाठी २३ नोव्हेंबर २०२० ही शेवटची तारीख आहे. आयबीपीएसच्या वेळापत्रकानुसार एसओ पदासाठीची पूर्व परीक्षा २६ आणि २७ डिसेंबर २०२० रोजी आयोजित होणार आहे. तर मुख्य परीक्षा ही ३० जानेवारी रोजी होईल. 

या पदांसाठी होणार भरती :-

  • – आयटी ऑफिसर स्केल
  • – अ‍ॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर
  • – मार्केटिंग ऑफिसर
  • – लॉ ऑफिसर
  • – एचआर पर्सनल
  • – ऑफिसर स्केल

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here