चीनचा मोठा निर्णय ! भारतातून येणाऱ्या नागरिकांना….

मुंबई :

अद्यापही भारत आणि चीनमधील तणाव निवळला आहे, असे चित्र नाही. दोन्ही बाजुंनी अजूनही क्रिया-प्रतिक्रिया चालू आहेत. अशातच चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हा निर्णय घेतला असल्याचे चीनने सांगितले आहे. या निर्णयाने भारत-चीन वादात अजून तणाव निर्माण होऊ शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे, असे वृत्त इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने दिले आहे.

आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. ३ नोव्हेंबरपर्यंत विझा मिळालेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर करोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला असून तात्पुरत्या स्वरुपाचा असेल असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नेमका हा निर्णय कोविडमुळेच घेतला की अजूनही काही कारणे आहेत?, अशाही शंका व्यक्त केल्या जात आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here