‘त्या’ विषयावर चर्चा करण्यासाठी ‘या’ भाजप नेत्याचे आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

‘आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या. आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत’, असे म्हणत भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण मा. उध्दव ठाकरेजी आज काँग्रेस सोबत करताय की काय?, असाही प्रश्न शेलार यांनी पुढे बोलताना उपस्थित केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण :-

आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानंतर आता आता एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केलेली असताना केंद्राने हे काम थांबवण्यास सांगितले असून ज्या जागेवर हे काम चालू आहे त्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. 

या प्रकरणावरून राज्यातील भाजप नेत्यांनी मविआ सरकारच्या नेत्यांवर जहरी टीका केली होती. दरम्यान याच विषयावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही आक्रमक झालेले आहेत. ते म्हणाले की, कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम थांबणार नाही. केंद्राकडून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची मला कल्पना आहे. पण ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here