‘त्या’ मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक; ठाकरे सरकारला केला ‘हा’ सवाल

मुंबई :

सध्या मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विरोधी पक्ष भाजप आपली भूमिका रेटून मांडताना दिसत आहे तर राज्य सरकारच्या बाजूने महाविकास आघाडी सरकारचे नेते आपण घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देत आहेत. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेत ‘पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?; असा सवाल मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना नांदगावकर यांनी म्हटले आहे की, राज्यात बार उघडले. बारची वेळही ठरवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सलाही परवानगी दिली. कोरोना काय फक्त मंदिरातच होतो काय? काय तर्क असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे.

महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहेच. परंतु तरीही राज्यात चोरट्या मार्गाने दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांनी गुटखा येत असून त्याला पायबंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुटखा सेवन करून काही लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतात. इतरांच्या आरोग्यासाठी हे घातक असल्यानेच देशभरातही गुटखा विक्रीवर बंदी आणा, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here