शेळीपालन करताना ‘ही’ महत्वाची पंचसूत्री घ्या लक्षात; शेळीपालनात होईल हमखास नफा

कमी खर्चात आणि कमी वेळेत होणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन आहे. या व्यवसायाचे  दिसून आलेले  महत्व  व उपयुक्तता तसंच लागणारं अत्यल्प भांड्वल, कायमस्वरूपी  उपलब्ध असलेल बाजारपेठ यामुळे शेळीपालन या व्यवसायाकडं मोठ्या प्रणाणावर लोक आकर्षित झाले आहेत. असे असले तरीही शेलीपालानाचा व्यवसाय करत असताना आपण ही महत्वाची पंचसूत्री लक्षात घेणे गरजेचे आहे.

अशी आहे पंचसूत्री :-

 1. जातींची निवड
 2. आहार व्यवस्थापन
 3. गोठाबांधणी व व्यक्स्थापन
 4. आरोग्य  व्यवस्थापन
 5. पणन व्यवस्थापन/विक्री व्यवस्थापन

सध्या शेळीपालन व्यवसायात अनेक चुकीचे सल्ले दिले जातात. आहार, गोठा आणि इतर गोष्टींसाठी वारेमाप खर्च केला जातो त्यामुळे खरेतर सहजपणे फायद्यात येणारा हा व्यवसाय तोट्यात जाताना दिसतो. सुरुवातीला आपण शेळीच्या जातीविषयी काही गोष्टी लक्षात घेऊया.

 • आजकाल सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध यशोगाथा समोर येत आहेत. अमुक अमुक जातीच्या शेळीपालन केले आणि एवढा फायदा मिळाला. अशा यशोगाथा वाचून त्याचे अंधानुकरण करून बरंचसे  शेळीपालन व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत सापडले  दिसतात. म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठ, पशुसंवंधन विभाग, केंद्रीय  शेळींपालन संशोधन संस्था यांच्याकडून सल्ला घेतला पाहिजे.

शेळीपालन करताना निसर्गतः वातावरण, चाऱ्याची उपलब्धता  यानुसार महाराष्ट्राला चार प्रमुख जाती दिलेल्या आहेत. या जाती विविध सरकारी संशोधन संस्थांनी सुचवलेल्या आहेत.

 1. मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्राच्या  कोरडवाहू भागासाठीउस्मानाबादी शेळ
 2. अहमदनगर , नाशिक, पुणे या भागासाठी संगमनेरी शेळी
 3. कोकण विभागासाठी कोकण कन्याळ.
 4. विदर्भासाठी बेरारी.
 5. गोठा व्यवस्थापन करताना लक्षात घ्या या गोष्टी :-

अतिऊन, वारा, पाऊस, हिंस्र श्वापदे यांपासून संरक्षण करण्यासाठी कमीतकमी खर्चात उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून शेळ्यांसाठी सुयोग्य गोठा बनवावा. (अतिपावसाच्या प्रदेशात हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी गोठ्यात माचणाचा वापर करावा)

गोचीड, पिसवा यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महिन्यातून १ ते २ वेळा गरजेनुसार गोठा स्वच्छ करुन गोचीड व पिसवांचे नियंत्रण करावे.

 • शेळी आपली ७० ते ८० टक्के भूक ही द्विदल चा-यावर भागविते. ही नैसर्गिकक्षमता लक्षात घेऊन शेळ्यांच्या आहारात जास्तीतजास्त प्रमाणात झाडपाल्याचा वापर करावा. शेळीपालन करण्यापूर्वी आपल्या शेताच्या बांधावर तसेच जेथे जेथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी लिंब, बाभूळ, सुबाभूळ, हादगा, शेवगा अशी दुहेरी उपयोगाची झाडे बेहडा, अर्जुन अशा निरनिराळ्या झाडांची लागवड करावी.
 • योग्य वेळी लसीकरण: शेळ्यांमधील लसीकरणाचे पुस्तकी तक्ते न वापरता पशूवैद्यकाच्या सल्ल्याने आंत्रविषार व पीपीआर या दोन जंतनिमुर्लन वर्षातून ३ ते ४ वेळा दरवेळी वेगवेगळ्या जंतनाशकाचा वापर करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावे.
 • शेळीपालन व्यवसाय करताना यशस्वी करायचा असेल तर एकच गोष्ट नियोजनानुसार करावी लागेल ती म्हणजेबोकडांची विक्री. ईदसाठी बोकड विक्रेते या एकाच संकल्पनेतून शेळीपालन करणारे अनेक लोक आहेत. दुर्दैवाने ईदच्या बाजारात बोकडांची आवक वाढल्याने अपेक्षित भाव बोकडांना मिळत नाही व दुर्दैवाने ब-याचदा तोट्यात व्यवसाय येतो.

असे करा नियोजन :-

● १o ते १५ टक्के बोकड पैदाशीसाठी विकावेत.

● १o ते १५ टक्के बोकड ईदसाठी तयार करावेत.

● ४0 ते ५0 टक्के बोकड स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार करावेत.

ईद पैदाशीचे बोकड/पाठी विकताना जास्त दर ठेवावा. अशारितीने विक्री व्यवस्थापन केल्यास आपल्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल. नवीन शेळीपालकांसाठी पुढील काही धोक्याची वळणे निर्देशित करीत आहोत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here