राष्ट्रवादीच्या आमदाराचा ‘त्यांना’ सवाल; काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?

मुंबई :

भाजपने मंदिरे खूली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीने मंदिरे उघडण्यासाठी तुळजापुरात आंदोलन केलं आहे. यावरून आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंवर निशाणा साधला. ‘साधूसंत सरकार पाडतील, साधूसंत म्हणजे नेमके कोण?, ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची नक्की व्याख्या कोणती?’, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी उपस्थितीत केला आहे.

पुढे बोलताना मिटकरी म्हणाले की, काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा? जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का?, वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही.

धर्माच्या नावावर वारकरी सांप्रदायाला बदनाम करण्याचं काम हे काही लोक करत आहे, असा आरोपही मिटकरी यांनी केली आहे. महाविकासआघाडीला बदनाम करण्यासाठी अशी टोकाची भाषा वापरली जात असल्याची टीकासुद्धा अमोल मिटकरींनी भाजपावर केली आहे.     

संपादन :स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here