विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला महाराष्ट्रात शाळा होणार सुरू

मुंबई :

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मधल्या काळात प्रशासनाकडून शाळा सुरु करण्यासाठीची सूचक वक्तव्य करण्यात आले होते. विद्यार्थी आणी पालकांचे आता शाळा कधी सुरु होणार, याकडे लक्ष लागलेले आहे. अशातच राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुढे बोलताना वर्षा गायकवाड यांनी दिली.

शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here