हे प्रेरणादायी विचार वाढवतील तुमचा आत्मविश्वास; नक्कीच वाचा

 • – कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे
 • – गरूडाइतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
 • – आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
 • पहिली: जे आवडते ते मिळवायला शिका.
 • दुसरी: जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका. 
 • – गौरव हा पडण्यात नाही…..पडून उठण्यात आहे.
 • – घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.
 • – जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
 • – वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस! 
 • – व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.
 • – सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
 • – स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here