कृषी विद्यापीठात आंदोलनाचे वारे; पहा कोणत्या मुद्द्यावर कर्मचारी संघटना झालीय आक्रमक

केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केल्याने तो सर्वांना मिळण्याची आस लागलेली आहे. पगारात भरघोस वाढ होणार असल्याने सरकारी कर्मचारी त्याकडे डोळे लाऊन आहेत. तोच लागू होत नसल्याने महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे.

सातवा वेतन आयोग सर्वच कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसेंसोबत संघटनेची झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यातून कोणताही तोडगा निघालेला नसल्याने व सातवा वेतन आगोग लागू करण्याचे कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आजपासून कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाच्या पवित्र्यावर कर्मचारी ठाम राहण्याची शक्यता आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here