‘या’ तारखेला महाविद्यालये सुरू हाेणार; यूजीसीकडून हिरवा कंदील

दिल्ली :

लॉकडाऊनपासून बंद असलेली शाळा महाविद्यालये कधी उघडली जाणार, याबाबत अजूनही साशंकता आहे. अधून मधून सरकारकडून शाळा-महाविद्यालये उघडली जाण्यासाबंधी सूचक वक्तव्ये केली जात असली तरी नेमकं कधी उघडणार, याबाबत अजून खात्रीलायक कुणीच सांगितलेले नाही. दरम्यान आता दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखवला आहे.

कंटेनमेंट झोन नाहीत अशा विभागांतील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावेत तसेच या संबंधित मार्गदर्शक सूचनाही विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जारी करण्यात आल्या आहेत. या सर्वात विशेष गोष्ट म्हणजे आरोग्य सेतू ॲपवरून एवढा गोंधळ उडाला असला तरीही महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ॲप असणे बंधनकारक असेल.

युजीसीने दिलेल्या सूचना :-

  • पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत
  •  महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना स्वेच्छा उपस्थितीची परवानगी द्यावी असे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांतील एकूण विद्यार्थी संख्येच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश द्यावेत.
  • प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाले तरी विद्यापीठांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे.
  • महाविद्यालय सुरू केल्यावर जर कोणत्या विद्यार्थ्याला करोनाची लक्षणे जाणवली तर त्याचे तातडीने विलगीकरण करण्यात येईल.
  • राज्य सरकारांनी राज्यातील शिक्षण संस्थांना एकसमान नियम करावेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here