कोर्टाने दिला ट्रम्पना झटका; पहा नेमके काय म्हटलेय आदेशात

आपण जिंकत नसल्याचे पाहून आता थेट अमेरिकन निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर टीका करून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाचे दार ठोठावले आहे. अशावेळी मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने फेटाळल्या आहेत. हा ट्रम्प यांना मोठा झटका आहे.

जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्याने अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. अशावेळी हा निकाल आल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोस्टल मतदानात घोळ झाल्याचा आरोप करीत ट्रम्प कोर्टात गेले होते. त्यावर ही केस न घेण्याचे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने ही केस फेटाळली आहे.

या निवडणुकीत बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले आहेट. त्यांना आतापर्यंत 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. म्हणजेच त्यांना विजयासाठी फ़क़्त 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. त्यामुळे निकालाचा कल स्पष्ट झालेला आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here