म्हणून कंगनाने राउतांच्या ट्विटवर म्हटले ‘भेड़ियों का झुंड’; पहा नेमका काय प्रकार आहे ते

सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने टीका करून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे. अशावेळी त्यांच्या विरोधात सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने सर्वांना ‘भेड़ियों का झुंड’ म्हटले आहे.

कंगनाने एका टीव्ही मुलाखतीत म्हटले होते की, अख्तर यांनी ऋतिक रोषण यांच्या वादामध्ये हस्तक्षेप केला होता. त्यावेळी ऋतिकसोबत असलेल्या संबंधांबाबत कुठेही वाच्यता न करण्याचे अख्तर यांनी म्हटले होते, असा दावाही कंगनाने केला होता.

त्यावर अख्तर यांनी पोलिसांमध्ये तक्रार देऊन आपण असे काहीही म्हटले नसल्याचे लेखी दिलेले आहे. त्यावरील ट्विटर प्रतिक्रिया शिवसेना खासदार व पत्रकार संजय राउत यांनी दिली आहे.

याच प्रतिक्रियेला पोस्ट करताना कंगनाने म्हटले आहे की, एक थी शेरनी ….. और एक भेड़ियों का झुंड ।

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here