रिलायन्सची यशस्वी घोडदौड; ‘ही’ बडी कंपनी करणार रिलायन्स रिटेलमध्ये ‘इतक्या’ हजार कोटींची गुंतवणूक

दिल्ली :

लॉकडाऊनच्या दरम्यान रिलायन्सने गुंतवणूक मिळवण्यासंबंधी जी घोडदौड सुरु केली होती. ती अजूनही कायम आहे. आता सौदी अरेबियाची एक बडी गुंतवणूक कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये तब्बल 9,555 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 9,555 कोटी रुपयांमध्ये या कंपनीला रिलायन्स रिटेलमधील 2.04 टक्के हिस्सा मिळणार आहे. सौदी अरेबियाची गुंतवणूक कंपनी PIF (Public Investment Fund) ने रिलायन्स रिटेलमधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

PIF ने म्हणजेच पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडने यापूर्वीही रिलायन्समध्ये गुंतवणूक केलेली आहे. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11367 कोटी रुपयांची गुंतवणूक PIF ने केली आहे. यातून त्यांना 2.32 टक्के हिस्सा मिळाला आहे. PIF सौदी अरेबियाचा सोव्हरेन वेल्थ फंड आहे.  

दरम्यान रिलायन्स रिटेलने आजवर तब्बल 47265 कोटी रुपये जमा केलेले आहेत. अवघ्या काही महिन्यात जमा केलेली ही रक्कम परदेशी गुंतवणूकदारांकडून उभा करण्यात आलेली आहे. सौदी अरेबियाशी आमचे (Reliance) दीर्घ संबंध आहेत. त्याचबरोबर PIF सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला प्रगती देण्यास आघाडीवर आहे. रिलायन्स रिटेलमधील महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून मी PIF चे स्वागत करतो. रिलायन्स रिटेलसह भारतीय रिटेल क्षेत्राला पुढे नेण्यासाठी PIF चे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

रिलायन्स रिटेलचे लक्ष लाखो ग्राहक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (MSME) सबलीकरण करण्यावर तसेच जागतिक आणि देशांतर्गत कंपन्यांशी प्राधान्यीकृत भागीदार म्हणून जवळून काम करून भारतीय किरकोळ क्षेत्राला संगठित करण्यावर आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here