मोदींनी वाचवले भारताला, तर ट्रम्प यांनी केले ‘हे’; नड्डा यांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

अमेरिकन निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोडी यांचे जिगरी यार असलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होण्याची शक्यता असतानाच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अजब दावा करून टाकला आहे. त्यांनी करोना विषाणूच्या संक्रमणातून भारताला मोदींनी वाचावाल्याचा दावा करतानाच ट्रम्प अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

दरभंगा येथील निवडणूक मेळाव्यात बोलताना नड्डा यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आसनातच त्यांनी covid 19 आजाराच्या संक्रमणातून देशाला वाचावाल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेत आतापर्यंत ८४ लाख लोकांना या विषाणूची लग्न झाल्याने १.२४ लाख लोकांचे मृत्यू झालेले आहेत.

त्याचवेळी भारतात खूप चांगली परिस्थिती आहे. मोदींनी उत्तम नियोजन केल्याने देश त्यांच्या पाठीशी आहे. त्याचवेळी अमेरिकेत मात्र करोना विषाणूच्या साथीचे नियंत्रण करण्यात ट्रम्प प्रशासनाला अपयश आले होते. त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेत त्यांच्या विरोधात मतदान होत असल्याचे आडमार्गाने नड्डा यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here